सामुग्रीवर जा

टेक इट डाऊन (Take It Down).
ऑनलाइन नग्न (न्यूड) दिसणे भितीदायक आहे,
परंतु आशा आहे की ते काढून

टाकले जाईल. ही सेवा म्हणजे 18 वर्षाचे होण्यापूर्वी ऑनलाइन काढलेले नग्न (न्यूड), अंशत:नग्न किंवा लैंगिकदृष्ट्या सुस्पष्ट फोटो आणि व्हिडिओ काढून टाकण्यात मदत करण्यासाठी तुम्ही उचलू शकता असे हे एक पाऊल आहे.

सुरुवात करू या

टेक इट डाउन (Take It Down) म्हणजे काय?

टेक इट डाउन (Take It Down) ही एक विनामूल्य सेवा आहे जी तुम्हाला 18 वर्षा चे होण्यापूर्वी काढलेले नग्न (न्यूड) , अंशत: नग्न किंवा लैंगिकदृष्ट्या सुस्पष्ट इमेज किंवा व्हिडिओ काढण्यात किंवा ऑनलाइन शेअर करणे थांबविण्यात मदत करू शकते. सेवा वापरत असताना तुम्ही निनावी राहू शकता आणि सेवा वापरत असताना तुम्हाला तुमच्या इमेजेस किंवा व्हिडिओ कोणालाही पाठवावे लागणार नाहीत. टेक इट डाउन (Take It Down) हे सार्वजनिक किंवा संकेतशब्द नसलेल्या आणि सहकार्य करण्यास सहमत असलेल्या अशा ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर काम करते.

आपल्यासोबत असे घडते तेव्हा ते भयावह असू शकते, परंतु ते इतरांनाही घडू शकते. तुम्ही एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे आणि आम्ही तुम्हाला आणखी पावले उचलण्यात मदत करण्यासाठी येथे आहोत.टेक इट डाउन (Take It Down) ही नॅशनल सेंटर फॉर मिसिंग अँड एक्स्प्लॉयटेड चिल्ड्रेन द्वारे प्रदान केलेली सेवा आहे.

टेक इट डाउन (Take It Down) कोणासाठी आहे?

टेक इट डाउन (Take It Down) हे अशा लोकांसाठी आहे ज्यांच्याकडे नग्न (न्यूड), अंशत: नग्न किंवा 18 वर्षांचे होण्यापूर्वी जिथे त्यांनी कपडे घातलेले नाहीत किंवा खाजगी गोष्टी करत आहेत. ही छायाचित्रे किंवाव्हिडिओ त्यांच्या परवानगीशिवाय ऑनलाइन शेअर केले जात असतील, तर ते काढून टाकण्यासाठी त्यांना मदत मिळू शकते. उदाहरणार्थ, कदाचित तुम्ही एखाद्याला एखादा फोटो पाठवला असेल, पण आता ते आपणास धमकावत असतील किंवा ते कुठेतरी पोस्ट सुद्धा केले असतील. एखादी इमेज शेअर केली गेली आहे की नाही याबद्दल आपणास खात्री नसली तरीही, परंतु ती ऑनलाइन दिसू शकतील अशा ठिकाणांहून ती काढून टाकण्यासाठी काही मदत हवी असेल तर, ही सेवा तुमच्यासाठीच आहे.

तुमचे वय 18 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास, तुम्ही stopncii.org वर मदत मिळवू शकता.

टेक इट डाऊन कसे काम करते?

टेक इट डाउन (Take It Down) 18 वर्षांखालील लोकांच्या नग्न, अंशत: नग्न किंवा लैंगिकदृष्ट्या सुस्पष्ट इमेजेस किंवा व्हिडिओं ला हॅश व्हॅल्यू नावाचे एक अद्वितीय डिजिटल फिंगरप्रिंट असाइन करून कार्य करते. ऑनलाइन प्लॅटफॉर्म त्यांच्या सेवांवर या इमेज किंवा व्हिडिओ ओळखण्यासाठी आणि ही सामग्री काढून टाकण्यासाठी हॅश मूल्य वापरू शकतात. हे सर्व इमेज किंवा व्हिडिओ तुमचे डिव्हाइस शिवाय घडते कि��वा कोणीही ते पाहु शकत नाही. NCMEC ला फक्त हॅश मूल्य प्रदान केले जाईल.

ते कसे कार्य करते ते येथे आहे:

तुम्हाला तुमच्या डिव्हाइसवरून हॅश करायची असलेली लैंगिकदृष्ट्या सुस्पष्ट इमेज किंवा व्हिडिओ निवडा आणि “सुरुवात करा” वर क्लिक करा.

प्रत्येक इमेज किंवा व्हिडिओसाठी, टेक इट डाउन (Take It Down) एक “हॅश” किंवा डिजिटल फिंगरप्रिंट तयार करेल ज्याचा वापर त्या इमेज किंवा व्हिडिओची अचूक प्रत ओळखण्यासाठी केला जाऊ शकतो.

तुमची इमेज किंवा व्हिडिओ तुमच्या डिव्‍हाइसवर राहतो आणि अपलोड केला जात नाही. हॅश एनसीएमईसी (NCMEC) द्वारे राखलेल्या सुरक्षित सूचीमध्ये जोडलाजातो , जो केवळ ऑनलाइन प्लॅटफॉर्मसह शेअर केला जातो ज्यांनी ही सूची त्यांच्या सार्वजनिक किंवा एंक्रिप्ट न केलेल्या साइट आणि अॅप्स स्कॅन करण्यासाठी आपल्या लैंगिकदृष्ट्या सुस्पष्ट सामग्रीच्या हॅशसाठी वापरण्यास सहमती दर्शविली आहे.

एखाद्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मला त्याच्या सार्वजनिक किंवा एनक्रिप्ट न केलेल्या सेवेवर हॅश मूल्याशी जुळणारी इमेज किंवा व्हिडिओ आढळल्यास, त्या लैंगिकदृष्ट्या सुस्पष्ट सामग्रीचा प्रसार मर्यादित करण्यासाठी कारवाई करू शकते!

कृपया तुम्ही येथे सबमिट केल्यानंतर कोणत्याही सोशल मीडियावर इमेज/व्हिडिओ शेअर करू नका. एकदा तुमच्या इमेज किंवा व्हिडिओसाठी हॅश व्हॅल्यू सूचीमध्ये जोडल्या गेल्यावर, ऑनलाइन प्लॅटफॉर्म त्यांचा सार्वजनिक किंवा एनक्रिप्ट न केलेल्या सेवा स्कॅन करण्यासाठी त्यांचा वापर करू शकतात. आपण भविष्यात कंटेंट पोस्ट केल्यास, ते पकडले जाऊ शकते आणि आपल्या सोशल मीडिया खात्यावर ब्लॉक केले जाऊ शकते.

ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर भूतकाळात पोस्ट केलेले कंटेंट काढून टाकण्याची मर्यादित क्षमता असू शकते. अतिरिक्त मदतीसाठी किंवा तुमच्या इमेजेस किंवा व्हिडिओ पोस्ट केलेल्या एखाद्या विशिष्ट स्थानाबद्दल तुम्हाला माहिती असल्यास, तुम्ही एनसीएमईसी (NCMEC) च्या सायबरटिपलाइन (CyberTipline) ला देखील तक्रार करू शकता जिथे आम्ही अतिरिक्त सेवा आणि समर्थन देऊ शकतो.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, कृपया लक्षात ठेवा, तुम्ही एकटे नाही आहात! या सेवेबद्दल आणि इतर संसाधनांबद्दल अधिक माहितीसाठी, संसाधने आणि समर्थन पृष्ठ पहा.

संसाधने पहा

heading decoration

संसाधने आणि समर्थन

View Support Resource

तुम्हाला ऑनलाइन सामग्री काढून टाकण्यासाठी अतिरिक्त सहाय्य हवे असल्यास, थेट विविध ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर तक्रार करू शकता.

View Support Resource

या इमेज किंवा ऑनलाइन शोषणाच्या इतर प्रकारांबद्दल तुम्हाला धमकी देणार्‍या कोणाचीही तक्रार करायची असल्यास.

View Support Resource

तुम्ही युनायटेड स्टेट्समध्ये असाल आणि तुम्हाला भावनिक आधाराबद्दल अधिक माहिती हवी असल्यास, एनसीएमईसी (NCMEC) च्या मानसिक आरोग्य सेवांबद्दल जाणून घेण्यासाठी खाली क्लिक करा.